Monday, June 25, 2012

कबीराचे विणतो शेले

कबीराचे विणतो शेले कौसल्येचा राम बाई कौसल्येचा राम
भाबड्या या भक्तांसाठी देव करी काम ।। धृ ।।
एक एकतारी हाती भक्त गाई गीत
एक एक धागा जोड़ी जानकीचा नाथ
राजा घनश्याम ।। 1 ।।
दास रामनामी रंगे, राम होई दास
एक एक धागा गुंते, रूप ये पटास
राजा घनश्याम ।। 2 ।।

विणून सर्व झाला शेला, पूर्ण होइल काम
ठायी  ठायी शेलावारती दिसे रामनाम
गुप्त होई राम ।। 3 ।।

ळूळू उघडी डोळे, पाही तो कबीर 
विणोंनिया शेला गेला सखा रघुवीर 
कुठे म्हणे राम ।। 4 ।। 

No comments:

Post a Comment