Tuesday, June 12, 2012

देव बप्पा देव बप्पा नवसाला पाव माझ्या नवसाला पाव |
खाऊ चे झाड़ माझ्या अंगनात लाव ||

झाडाला येऊ दे लाडू आणि करंजी
रोज रोज खाण्याला ताजी पूरी भाजी  ।
मधुनच असू देत बटर  आणि पाव
खाऊ चे झाड़ माझ्या अंगनात लाव  ।। 1 ।।


झाडाला येऊ दे आइसक्रीम चे  तुरे
गोळ्याच्या कळ्या आणि चोंकलेट  ची फुले ।
बिस्किटा च्या झाडां ना साखर  थोड़ी लाव
 खाऊ चे झाड़ माझ्या अंगनात लाव  ।। 2 ।।


आई पाशी करणार नाही कधी मी हट्ट
झडाचा खाऊ खाऊन होइन मी लट्ठ ।
झाडावर असुदेत पण माझेच नाव
खाऊ चे झाड़ माझ्या अंगनात लाव ।। 3 ।।

No comments:

Post a Comment