Monday, March 19, 2012

राजाराणी ची नको चिऊ काउ ची नको
गोष्ट मला सांग आई रामाची  ।
वेळ माझी झाली आता झोपेची ,
वेळ माझी झाली आता झोपेची ।।

राम गेला का वनी
त्याला धाडिले कुणी
भीती कशी आली नाही त्याच्या ग मनी
सोबत होती का गं त्याला कोणाची
गोष्ट मला सांग आई रामाची । ।

Monday, March 5, 2012

हृदयाच्या कोंदनात लाविली सांजवात
पञ्च ह्रदय पतंग भ्रमति मोहात गुंतताती
८४ फेर घेती लाविली सांजवात
सुखी सगळ्यानां ठेव देव राया मागणे हे आमुचे तुझ्या पाया
ठेव शेतकरी सदा हा खुशाल तरी मागू ते आम्हाला मिळेल
नसो अमुचा सोबती कुणी उपाशी नको अमुचा सोबती कुणी अधाशी
नसो कपड्यांची कुणालाही वाण मिळो रहान्यालां पुरेसे मकान
नको कोणाच्या इडा पीड़ा पाठी घरी नांदो संपदा प्रहर आठी
दिवा बत्तीला कधी न पदों खंड आयु लाभों घर धन्याला उदंड

रामायण

आदौ राम तापोवानादिगमनं हत्वा मृग: कांचनं
वैदेही हरणं जटायु मरणं सुग्रीव संभाशणं
वाली निर्दलनं समुद्र तरणं लंकापुरी दाहणं
पश्यात रावण कुम्भकर्ण हननं एतद्ही रामायणं

आदौ देवकी देवी गर्भ  जननं गोपी गृहे वर्धनं
माया पूतन जीविता पहरनमं गोवर्धनो धारणं
कंस छेदन  कौरवादि हननं कुंती तनु जाहनं

आई

जिने वाढविले नउ मास ओझे
जिने चिंतिले नित्य कल्याण माझे
जिला मोद हो पाहुनी बाललीला
नमस्कार माझा तया माउलीला