Sunday, June 17, 2012

लाडू च्या डब्यात जमले दहा

एक  राहिला उभा
दोन झाले आडवे
तीनच्या पायाला घडी
चार हात वर काढी
एकच पाय पाचाला
हाका  मारी सहाला
तोंड वाशी सात
धावत आले आठ
पाय घसरला नवाचा
लाडूचा नंबर दहाचा

2)

उभा एक
आडवे दोन
गाठी चे तीन
गायीला पाय चार
हाताची बोटे पाच
उलटे तीन सहा
गुरवाचे चे शिंग सात
आजोबांची काठी आठ
सन्धेची पळी नऊ
एकावर पूज्य दहा


No comments:

Post a Comment