Tuesday, March 24, 2009

गुरुवार हा दत्ताचा वार
माझ्यासाठी केलास तर नक्कीच पावणार

कल्पवृक्षाची सावली - सुरेखा हरी जोशी

कल्पवृक्षाची साऊली माझी माय तू माउली

धन्य झाली दोहो कुळी बाले आनंदली सगली

दुःखे गिळुनिया सारी घाव झेलिले छातीवरी

अमृताचा तुझा कुंभ रिता न हो कधी काळी १

चिंतामणी तू आमुची कामधेनु तू जगाची

'जग्न्मित्र' वदति तुजला ममता कोठून आणली २

निर्झर तुझ्या ग मायेचा सर्वदूर कसा वाहतो

प्रश्न छेदितो हृदयाला अनुत्तरित राहतो ३

'माई' हाकारित आला ऐसा कुणी भला बुरा

विन्मुख होउनी गेला म्या ना कधीच पाहिला ४

किती संत नि महंत आले तुझ्या ग दारात

देती आशीष अनंत बाले सुखात नान्दोत ५

शुभाशीष झाला खरा भाग्य आले तुझ्या घरा

विद्यालक्ष्मीने दारीफेर आनंदे धरिला ६

क्षुधार्तांची क्षुधा जान तृषार्तांची तृषा जान

तुझे सतीचे हे वान आम्हा संस्काराचे दान ७

हिरा कोंदानी शोभतो सुवार्नाने तेजालातो

तैसे तुझ्या सहावासे निद्रा सुखाची भोगतो ८

दोन्ही कराना जोडून नर हरिला प्राथिते

दुःखा स्पर्शु नको तिला हेच मागने मगिते

रोज माझ्या स्वप्नात येतेस
बोलत मात्र काहीच नाहीस
प्रत्यक्षात भेटल्यावर
स्वप्नाचा अर्थ सांगत नाहि

Monday, March 23, 2009

दिवसा मागून दिवस - श्रीस्वरूप उर्फ़ देवेन्द्र जोशी

दिवसा मागून दिवस जातील
रात्री मागून रात्र
आजचा दिवस सांभाळून ने
इतकेच तुला सांगण

दुःखाचा हा वणवा
कधी तू थांबवणार
आयुष्याच्या झाडाला
मोहर कधी फुटणार

इतका नको रे दष्ट होवूस
नकोस हू निर्दयी
तुझ्याशिवाय माझ्यासाठी
आहे का रे कोणी

अरे वेड्या सोडून दे
विचार करणे इतका
जीवनाचा क्रम असा
चुकला बरे कुणाला

मी आहे तुझ्याबरोबर
काळजी करू नकोस
विश्वासाने चालत रहा
सर्व होइल बरोबर

लोकांची तू पर्वा
करणे सोडून दे
दुःखातल्या त्या आसवांना
दूरवर फेकून दे

मी आहे तुझ्या बरोबर
माझ्यावर सोडून दे , माझ्यावर सोडून दे