Saturday, June 16, 2012

1)
 उमचे रमेचे तसे शारदेचे
जपध्यान तुझे तसे जन्मदेचे
तुझ्याकरणे हा यशस्वी  प्रवास
तुझ्या वन्दितो मावूली पावुलास

2)

वदनि कवळ घेता नाम घ्या मातृभूचे
सहज स्मरण होते आपुल्या बान्धवाचे
कृषिवल कृषिकर्मी राबती दिनरात
श्रमिक  श्रम करोनि वस्तु त्या निर्मितात
करून स्मरण त्यांचे अन्न सेवा खुशाल
उदरभरण आहे चित्त होण्या विशाल

3)

सर्व मंडळी स्वस्थ होऊ द्या
उशीर जहाला माफी असू द्या
शिशिर भोजन हे गोड  करूनी  घ्या
गोष्टिमाष्टि त्या तूर्त रहू द्या

4)

धुवा हात पाय चला भोजनाला
बसा नीट येथे तुम्ही मांडी घाला
नका मगु कही अधाशी पणाने
नका काही टाकू करा  स्वछ पाने

5)
मुखी घास घेता करावा विचार
कशासाठी हे  अन्न मी हे सेविणार
घडो माझिया हातुनी देशसेवा
म्हणोनी मिळावी माला शक्ती  देवा

6)
पुण्या जवळ सासवड गाव
तेथे नांदतो सोपान देव
सोपान देवाची करतो मी सेवा
पाहुणे मंडळी सावकाश जेवा


7)
उडाला उडाला कपि उडाला
समुद्र लंघोनी लंकेस गेला
लंकेस जाता चमत्कार झाला
नमस्कार माझा तया मारुतीला



No comments:

Post a Comment