Monday, February 9, 2015

प्राण्यांची जत्रा

एकदा काय  गम्मत झाली 
एक रानात जत्रा भरली  ।
अस्वल बनले दुकानदार
खेळणी मांडली छानदार ॥ १॥

झाडावरून खार आली
दुकान पाहून धुंध झाली ।
 तिने घेतल्या लेमन गोळ्या
१० पैश्याच्या मिळाल्या १६  ॥ २॥ 

शिळ घालित पोपट आला
लाल लिपस्टिक घेऊन पळाला ।
डरकाली फोडत वाघोबा आले
अस्वल दुकान टाकून पळाले ॥ ३॥

No comments:

Post a Comment